Ad will apear here
Next
गणेशभक्तांकरिता मोफत वैद्यकीय सेवा
संचेती हॉस्पिटल आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा उपक्रम

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात गणपती दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता संचेती हॉस्पिटल आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे. तत्काळ सेवेची गरज भासल्यास दोन अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून, आतापर्यंत या उपक्रमाद्वारे ३७०हून अधिक व्यक्तींना मदत मिळाली आहे. गणेश विसर्जनापर्यंत हा उपक्रम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मंदिराशेजारी सुरू राहणार आहे. 

गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीत एखाद्याला तातडीनं वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास ती पुरविण्यासाठी संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली संचेती हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीम मदतीकरिता सज्ज आहे. दर्शनासाठी आलेल्या गर्दीमध्ये अचानक थकवा येणे, सांधेदुखी, पायदुखी, मणका दुखणे, श्वा.स गुदमरणे, चक्कर येणे, रक्तदाब वाढणे, जखम अथवा दुखापत झाल्यास संचेती हॉस्पिटलतर्फे मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZXJCE
Similar Posts
‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण’ पुणे : ‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारामध्ये आर्थोपेडिक शस्त्रक्रिया आणि फिजिओथेरपीची महत्त्वाची भूमिका असते. यामुळे शरीराची हालचाल सुधारण्यास मदत होते’, असे मत संचेती हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक आर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटवर्धन यांनी व्यक्त केले.
दगडूशेठ हलवाई गणपतीला यंदा कोणार्कच्या सूर्यमंदिराची सजावट पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२७व्या वर्षानिमित्त यंदा श्री गणेश सूर्यमंदिर साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीदिनी सोमवारी, दोन सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प. पू. विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे
पिंपरी-चिंचवडमधील ‘जंगल बचाव’ देखावा सर्वांचे आकर्षण पिंपरी-चिंचवड : सध्या घरोघरी गणपतीबाप्पाचे आगमन झाले असून, त्याच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या घरगुती देखाव्यांचीही चर्चा आणि कौतुक होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरणप्रेमी प्रभाकर पवार यांनी केलेला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा देखावाही चर्चेचा विषय ठरला आहे
पुण्यात साने गुरुजी तरुण मंडळातर्फे राम मंदिराची ६० फूट उंच प्रतिकृती पुणे : पुण्यातील साने गुरुजीनगरमधील साने गुरुजी तरुण मंडळाने यंदा गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती १०० फूट लांब, ४० फूट रुंद आणि ६० फूट उंच आहे. दोन सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते मंडळाच्या गणपतीबाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language